Tuesday, November 30, 2010

मनोजकुमारचा मराठा सेवा संघातर्फे दिल्लीत जंगी सत्कार

नवी दिल्ली – राष्ट्रकुल स्पर्धेसाठी दिल्लीला जाताना आशीर्वाद घेण्यास आलेल्या मनोजला मी सांगितलं होतं, “बेटे, अपने देशका नाम रोशन करना। सोनाही लेके घरको लौटके आना।” आणि काय सांगू, त्यानंही सुवर्णपदक मिळवून माझा आशीर्वाद खरा ठरविला…” ६४ किलो वजनी गटात मुष्टियुद्धात लखलखीत कामगिरी करणाऱ्या भारतीय संघातील मनोजकुमारचे वडील शेरसिंह कुलगडिया आज सकाळ न्यूज नेटवर्कला सांगत होते. मनोजकुमार हा पानिपत भागातील अस्सल मराठा गडी आहे, हे फार कमी जणांना माहिती असेल.

हरियानातील कर्नाल जिल्ह्यातील जौंद हे त्याचे मूळ गाव. त्याचे वडील शेरसिंह सैन्यात होते. सैन्यातून निवृत्ती घेतल्यावर ते जौंदमध्ये शेतीवाडी करू लागले. त्यांना राजेश, मनोज व मुकेश ही तीन मुले. तिघांनाही खेळाची आवड. कालांतराने राजेश हरियाना ज्युनिअर बॉक्‍सिंग संघाचा कोच झाला. त्याने मुकेशमधील गुणवत्ता ओळखून त्याला आपल्याकडे नेले. त्याच्यातील गुणवत्तेला गेल्या बुधवारी तालकटोरा स्टेडियममध्ये पुन्हा “सुवर्णझळाळी’ लाभली. सोनिपत येथे रेल्वेत नोकरीला असलेला मनोज राष्ट्रकुल स्पर्धेच्या आधी आवर्जून गावी गेला होता. मनोजचं कौतुक करण्यासाठी आपल्याजवळ शब्द नाहीत. त्याने असेच नाव कमवावे एवढेच वाटते, असेही त्यांनी सांगितले. मनोजचे यश हे मराठी मातीचेही यश आहे, असे सांगताच क्षणाचाही विलंब न लावता शेरसिंग उद्‌गारले, “हम लोग तो मराठाही है साब..!”

हे मराठी कसे?
सन १७६१ च्या पानिपत युद्धाच्या वेळी श्रीमंत भाऊसाहेब पेशव्यांबरोबर येथे आलेली आणि नंतर येथील समाजात विरघळून गेलेली अनेक मूळची मराठी कुटुंबे या भागात आजही आहेत. पानिपत, कुरुक्षेत्र, कर्नाल, जिंद या निवडक जिल्ह्यांत ती राहतात. अनेक पिढ्या उलटल्या तरी आपण मूळचे मराठी आहोत, याचे त्यांना कधीही विस्मरण झाले नाही. त्यांची आडनावेही भोसले, चोपडे, झाकले, चौधरी, राणे, इंगोले अशी आहेत. कोल्हापूरचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. वसंतराव मोरे यांच्या निरीक्षणानुसार, त्यांची संख्या तब्बल सात लाख आहे. अलीकडे त्यांनी आपल्या नावाआधी “मराठा’ असे विशेषण लावणेही सुरू केले आहे. पानिपतनंतर जीव वाचविण्यासाठी आणि कालौघात या लोकांची भाषाही हिंदीच झाली असली, तरी “राम राम’सारखे अनेक मराठी शब्द त्यांनी वापरात कायम ठेवले आहेत.

हरियानातील रोड मराठा समाज
पानिपतच्या तिसऱ्या युद्धात वाचलेल्या मराठा योद्‌ध्यांची पिढी हरियानात रोड मराठा नावाने ओळखली जाते. डॉ. मोरे यांच्या नेतृत्वातील संशोधकांच्या चमूने सहा वर्षांपूर्वी यासंदर्भात बऱ्याच नव्या बाबी समोर आणल्या होत्या. मनोजकुमार हा रोड मराठा कुटुंबातील आहे. शेरसिंह मराठा असे त्यांचे नाव लावतात. मनोजकुमारच्या सुवर्णपदकाने समाजात आनंदाचे वातावरण आहे. रोड मराठा समन्वय समितीचे प्रमुख डॉ. मांगेरामजी चोपडे यांनी “सकाळ’शी बोलताना सांगितले, की शेती व्यवसायात भवितव्य शोधणाऱ्या रोड मराठा समाजातील तरुणांसाठी मनोजकुमार रोल मॉडेल बनला आहे. गेली अडीचशे वर्षे संघर्षरत राहिलेल्या या लढवय्या समाजाच्या नव्या पिढीला क्रीडा क्षेत्रातही भवितव्य असल्याचे मनोजकुमारने दाखवून दिले आहे. मनोजकुमारचा मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर आणि हरियानातील रोड मराठा संघटनेचे नेते वीरेंद्र वर्मा यांच्या मदतीने दिल्लीत जंगी सत्कार करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

मराठा सेवा संघला २० वर्षे पूर्ण ....

1st sept 2010 - मराठा सेवा संघला २० वर्षे पूर्ण .... मराठा सेवा संघाची वाढ अशीच होत राहो.. बहुजनवादी दृष्टीकोनातून समाजकार्य असेच पुढे चालू राहो.. हार्दिक शिवेच्छा...

Sunday, November 9, 2008

मराठा सेवा संघाचे अधिवेशन उत्साहात संपन्न











maratha seva sangh, sambhaji brigade, jijau brigade, shivdharma

मराठा सेवा संघाचे अधिवेशन उत्साहात सुरु...
मराठा आरक्षणासाठी आता नियोजनबद्ध लढा - नेताजी गोरे
अमरावती, ता. ८ - अठरा वर्षांच्या कार्यकाळात मराठा सेवा संघाने वेळ, पैसा, कौशल्य व श्रमबुद्धीचा विकास साधला. या माध्यमातून समाजाची सेवा करणारी ही चळवळ आता गावागावांपर्यंत पोचली असली,तरी आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्यासाठी आता नियोजनबद्ध लढा उभारण्याची आवश्‍यकता असल्याचे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे यांनी आज (ता. आठ) येथे केले. येथील संत ज्ञानेश्‍वर सांस्कृतिक भवनात मराठा सेवा संघाच्या १३ व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्‌घाटनपर कार्यक्रमात ते बोलत होते.
येथील संत ज्ञानेश्‍वर सांस्कृतिक भवनात मराठा सेवा संघाच्या १३ व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्‌घाटनपर कार्यक्रमात ते बोलत होते. उद्‌घाटन राज्याच्या जलसंपदा विभागाचे सचिव व्यंकटराव गायकवाड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. पंजाबराव देशमुख विचारपीठावर नंदा गायकवाड, पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, आमदार सुलभा खोडके, जिल्हाधिकारी डॉ. पुरुषोत्तम भापकर, आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त जी. पी. गरड, अमरावती विभागाच्या जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एम. व्ही. पाटील, श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड. अरुण शेळके, संभाजी ब्रिगेडचे राज्याध्यक्ष अनंत चोंदे, कर्नाटक येथील राजाराम गायकवाड, उत्तर प्रदेशचे डॉ. गगवार, हरिभाऊ ठाकरे, जिजाऊ ब्रिगेडच्या राज्याध्यक्षा जयश्री शेळके, डॉ. साहेब खंदारे, विजयकुमार ठुबे, देवानंद कापसे, डॉ. गणेश पाटील, राजाभाऊ तायवाडे बी. टी. देवरे आदी उपस्थित होते. सभागृहात मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, माजी आमदार बबनराव मेटकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
गोरे म्हणाले, संस्कृती, इतिहास, धर्मकारण, राजसत्ता अशा विविध आघाड्यांवर मराठा सेवा संघाने कार्य केले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर सखोल अभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळे समाजाला आरक्षण लागू व्हावे, यासाठी प्रत्येकाने आता पुढे येण्याची आवश्‍यकता आहे. कुणबी व मराठ्यांना संधी दिली गेली नाही, त्यामुळेच हा समाज मागे राहिला. परंतु, "सरकार कमी तिथे आम्ही' हे आम्ही सिद्ध करून दाखविले आहे. त्यामुळे सरकारने आता आमच्या समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा, यासाठी गावागावांतून जनजागृती करण्याचे काम प्रत्येक कार्यकर्त्याने करावे. गायकवाड म्हणाले, "अनेक प्रश्‍न सोडविताना अडचणी येत असतात; मात्र लोकसेवेत असतानाही समाजाची सेवा करणारी मंडळी या संघटनेत आहे. शेतकरी हा आपल्या समाजाचा गाभा आहे. शेतीला पाणी मिळावे व विदर्भातील सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी शासनाने केलेले प्रयत्न अत्यंत योग्य पद्धतीने झाल्याने येत्या काही वर्षांतच विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. शेती व शिक्षण या दोन आघाड्यांवर आपल्याला आता लक्ष देणे आवश्‍यक आहे. घरातील एका व्यक्तीने शेती करावी व अन्य सदस्यांनी जमेल तो व्यवसाय अथवा नोकरी करावी. शिक्षण योग्य पद्धतीचेच घेतले जात आहे किंवा नाही, हे पाहण्याची जबाबदारीदेखील आपलीच आहे. पारंपरिक विचार बाजूला सारून कुटुंबासाठी प्रत्येकाने "रोल मॉडेल' व्हावे. केवळ भाषण देऊन काम होणार नाही, त्यामुळे प्रत्येकाने "दूत' व्हावे. काळानुरूप प्रश्‍न पुढे येत असल्याने हे प्रश्‍न ओळखण्याची क्षमतादेखील विकसित करा, असे आवाहनदेखील त्यांनी केले. विचारपीठावर उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली. विविध पुस्तकांचे व स्मरणिकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अधिवेशनासाठी विविध राज्यांतील हजारो प्रतिनिधी अमरावतीत दाखल झाल्याने संत ज्ञानेश्‍वर सांस्कृतिक भवनात प्रचंड गर्दी झाली होती. संचालन चंद्रशेखर कोहोळे व सीमा देशमुख यांनी तर आभार प्रा. नरेशचंद्र काठोळे यांनी मानले.


मराठ्यांचा आत्मा जागृत करणे महत्त्वाचे - ऍड. अरुण शेळके
अमरावती, ता. ८ - पूर्वीच्या काळी मराठा समाजात विचारांची क्रांती झाल्याने सत्तेचा उदय झाला. मात्र, तो झाला नसता तर इतिहास कदाचित वेगळाच राहिला असता. पण, मध्यंतरीच्या काळात समाजातील विचार संपला. त्यामुळे प्रगतीपासून वंचित राहिलेल्या तळागाळातील समाजबांधवांना समोर आणण्यासाठी मराठ्यांचा आत्मा जागृत करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी समाजात वावरताना व्यापक दृष्टिकोन ठेवावा लागेल, असे मत शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड. अरुण शेळके यांनी व्यक्त केले. मराठा सेवा संघाच्या जिल्हा शाखेच्या वतीने श्री संत ज्ञानेश्‍वर सभागृहातील डॉ. पंजाबराव देशमुख विचारमंचावर आयोजित १३व्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. या प्रसंगी उद्‌घाटक राज्य जलसंपदा विभागाचे सचिव व्यंकटराव गायकवाड, त्यांच्या पत्नी नंदाताई गायकवाड, तर सत्राध्यक्ष म्हणून मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, आमदार सुलभा खोडके, जिल्हाधिकारी डॉ. पुरुषोत्तम भापकर, आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त जी. पी. गरड, अमरावती विभागाच्या जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एम. व्ही. पाटील, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड. अरुण शेळके, संभाजी ब्रिगेडचे राज्याध्यक्ष अनंत चोंदे, कर्नाटक येथील मराठा सेवा संघाचे अध्यक्ष राजाराम गायकवाड, उत्तर प्रदेशातून खास अधिवेशनासाठी आलेले डॉ. गगवार, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव हरिभाऊ ठाकरे, जिजाऊ ब्रिगेडच्या राज्याध्यक्षा जयश्री शेळके, जगत्‌गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे डॉ. साहेब खंदारे, मराठा सेवा संघाचे सचिव विजयकुमार ठुबे, शिवधर्म समन्वयक देवानंद कापसे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू व स्वागताध्यक्ष डॉ. गणेश पाटील, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ तायवाडे, बी. टी. देवरे होते. पूर्वी "कास्ट'मुळे शिक्षण शक्‍य नसताना आज "कॉस्ट'मुळे ते महाग झाले. राज्यात दोनच शिक्षणसंस्था अशा आहेत, ज्यात समाजाच्या कल्याणासाठी प्रत्येकाने शिक्षित व्हावे, या भावनेतून डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शिवाजी शिक्षण संस्था, तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन करून, आपले सर्वस्व पणाला लावले. त्यामुळे शिक्षण हा व्यवसाय व्हायला नको, असा उद्देश सर्वांनी डोळ्यांपुढे आज ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे समाजाच्या प्रगतीसाठी स्थापन झालेला मराठा सेवा संघ हा कोण्या जातीचा नव्हे, तर समाजाचा संघ असून, ज्यांच्या अंगात धर्म जागृत होईल, असे सेवक मराठा सेवा संघाने घडविण्याचे आवाहन ऍड. शेळके यांनी केले. "मराठा' हा दात्यांचा समाज म्हणून ओळखला जातो. त्यामुळे समाजात मागे राहिलेल्यांना पुढे आणण्यासाठी समाजाची झोळी सदैव भरलेली असणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजातील काही बांधव शासकीय सेवेत असताना नोकरीव्यतिरिक्त समाजाची वेगळी सेवा कशी करता येईल, याची सुरुवात झाली आहे. मराठा सेवा संघाचेही समाजाला बळकट करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असताना रस्त्यावर उतरून नारेबाजी करण्यापेक्षा प्रथम स्वतःला सक्षम करून, समाज बळकट करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भापकर यांनी केले. यावेळी कर्नाटकचे श्री. गायकवाड, डॉ. पाटील, श्री. तायवाडे यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता निळकंठ बांबल यांनी, तर संचालन चंद्रशेखर कोहळे व सीमा देशमुख यांनी केले. आभार डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी मानले.
मराठमोळ्या वैभवाची झलक मराठा सेवा संघाच्या १३व्या राष्ट्रीय अधिवेशनात मराठमोळ्या वैभवाची झलक बघायला मिळाली. फुलांच्या वर्षावात मान्यवरांचे स्वागत करणाऱ्या तरुणी, दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा, जिजाऊ वंदना आणि शिवकालीन महत्त्व विशद करणारे विचारपीठ, अशी खास रचना अधिवेशनासाठी केली आहे.
आई ही व्यक्तीआधी "संस्कार केंद्र'
अमरावती, ता. ८ - भारतीय संस्कृतीत आई ही केवळ व्यक्ती नसून, ते एक संस्कार केंद्रच आहे. मराठा सेवा संघाने पूर्वीपासूनच महिलांचा पुरस्कार केला.संत- महात्म्यांनीही महिलांना आदराचे स्थान दिले. त्याचा यथोचित आदर राखत कुटुंबाच्या जडणघडणीत एक आई आपली भूमिका यशस्वीपणे वठवीत असल्याचा सूर संत श्री ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात उमटला. मराठा सेवा संघाच्या १३ व्या राष्ट्रीय अधिवेशनात "आई आणि कुटुंबाची जडणघडण' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारच्या सत्रात झालेला हा परिसंवाद आमदार रेखा खेडेकर यांच्या अध्यक्षतेत रंगला. जयश्री शेळके आणि डॉ. अलका लुंगे यांनी यावेळी प्रमुख वक्ता म्हणून विचार मांडले. व्यासपीठावर डॉ. शोभा गायकवाड, मयूरा देशमुख, डॉ. जयश्री नांदूरकर, वैशाली कोहळे, कल्पना बुरंगे, सुरेखा लुंगारे यांची प्रमुख उपस्थिती होती. समाजपरिवर्तनाची पर्यायाने देशाच्या प्रगतीची भाषा करताना ही सुरुवात मानवाच्या संस्कारापासूनच होते आणि हे संस्कार मिळतात ते एका कुटुंबातून, त्यातही प्राधान्याने आईच्या संस्कारातून. मुलाच्या सुप्तगुणांना बालपणीच हेरण्याचं कसब केवळ एका मातेतच असते. त्यांच्या आंतरिक भावना जाणून त्याला खतपाणी घालण्याची जबाबदारी या आईनेच समर्थपणे पेलली असते, असे मत डॉ. अलका लुंगे यांनी यावेळी मांडले. श्रीमती शेळके यांनी भारतीयांसह पाश्‍चात्य लेखकांच्या आत्मचरित्रांचे संदर्भ देत त्यांच्या जडणघडणीत आईचाच वाटा मोठा असल्याचे स्पष्ट केले. परिसंवादाचा समारोप करताना रेखा खेडेकर यांनी राष्ट्रमाता जिजाऊंसह ताराबाई शिंदे आणि शारदाबाई गोविंदराव पवार यांचाही उल्लेख आवर्जून केला.
मराठा तितुका मेळवावा...!
ता. ८ - विविध विषयांवरील विचारमंथन... अनेक राज्यांतून आलेले प्रतिनिधी... विचारांचे आदानप्रदान व आपल्या समाजाच्या उत्थानासाठी पोटतिडकीने बोलणारी मंडळी, असे वातावरण आज श्री संत ज्ञानेश्‍वर सांस्कृतिक भवनाच्या डॉ. पंजाबराव देशमुख विचारमंच परिसरात होते.मराठा सेवा संघाच्या १३ व्या अधिवेशनानिमित्त देशभरातून हजारो प्रतिनिधी सकाळपासूनच या परिसरात दाखल झाले होते. विविध स्वरूपांच्या पुस्तकांचे स्टॉल या ठिकाणी लागले असल्याने नवी माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असलेल्यांचे पाय आपोआपच या ग्रंथप्रदर्शनाकडे वळले. सभागृहात प्रवेश करताच मॉं जिजाऊंच्या उत्कृष्ट रांगोळीने अनेकांना मोहित केले. त्यामुळे महिलांची या रांगोळीच्या भोवती गर्दी झाली होती. सर्वत्र उत्तम व्यवस्था असल्याने अन्य राज्यांतून आलेल्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रतिनिधींसोबतच डॉ. राजेंद्र कोकाटे, मयूरा देशमुख, डॉ. नरेशचंद्र काठोळे, हरिभाई लुंगे, चंद्रकांत मोहिते, मंगेश देशमुख, अशोक काळे, बाबा भाकरे, चंद्रशेखर कहाळे, कीर्तिमाला चौधरी, डॉ. अभय गावंडे, मनोहर वानखडे, अरविंद गावंडे, बाबूराव वानखडे, दिलीप पाटील, राजेंद्र अढाऊ, प्रकाश देशमुख, साहेबराव वाटाणे, भागवत झोड, रामदास पाटील, तु. ल. बारहाते, दामोदर टेकाडे, व्ही. बी. देशमुख, एस. पी. देशमुख, प्रकाश राऊत, प्रा. शांताराम चव्हाण, प्रा. जयंत इंगोले, गोविंदराव कुबडे, वा. मा. डहाणे, अशोक कोंडे, बाबासाहेब बांबल, दिगंबर वाघ, विजय लुंगे, प्रवीण मोहोड, प्रभाकर झोड, हरिदास उल्हे, रघुनाथ रोडे, मिलिंद बांबल, सतीश रोडे, इंदूताई गावंडे, अश्‍विनी झोड, सुनंदा खरड, शोभना देशमुख, कांचन उल्हे, पद्मा महल्ले, वैशाली कोहळे, प्रा. कविता डवरे, प्रकाश घाडगे, डॉ. संदीप कडू, अविनाश पांडे, मनीष पाटील, प्रा. चंदा वानखडे, अजित पाटील, नितीन ठाकरे यांच्यासह राजाभाऊ तायवाडे, प्राचार्य नरवडे, गोविंदराव कुबडे, पी. पी. निकास, शोभा साबळे, वैशाली कोहोळे, मोरेश्‍वर देशमुख, प्रदीप वानखडे, रोहिणी बळी, शीला पाटील, अरविंद गावंडे, अभय गावंडे, मैथिली पाटील, प्रदीप वानखडे, शालिनी कावरे आदी मंडळी या परिसरात होती.
तुकोबांचे शिक्षण विज्ञानवादी - शिक्षणमंत्री
अमरावती, ता. ८ - समाजातील अपप्रवृत्तींची बेडरपणे मांडणी करणारे तुकारामांचे विचार होते. चारशे वर्षांपूर्वीचा त्यांचा विवेकवाद व विज्ञानवाद, या युगात कुणीही नाकारू शकत नाही.त्यांचे शिक्षणविषयक धोरण हे आत्मविश्‍वास निर्माण करणारे "विज्ञानवादी' होते, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांनी केले. मराठा सेवा संघाच्या १३ व्या राष्ट्रीय अधिवेशनात "जगद्‌गुरू तुकाराम महाराजांचे शिक्षण धोरण' या विषयावर ते बोलत होते. सत्राध्यक्षा प्रा. डॉ. छाया महाले होत्या. प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. निर्मला वानखडे, माजी कुलगुरू डॉ. गणेश पाटील, डॉ. राजेंद्र कोकाटे होते. भारतात सर्वाधिक अज्ञान आहे. मात्र, चारशे वर्षांपूर्वी तुकाराम महाराजांची आत्मविश्‍वासू व वैज्ञानिक मांडणी आजही नित्यनूतन ठरू पाहणारी आहे. यातून त्या संताच्या बुद्धिकौशल्याची जाण होते. "निश्‍चयाचे बळ । तुका म्हणे तेची फळ।।' असे त्यांच्या अभंगगाथेतील अनेक दाखले देत श्री. पुरके यांनी त्यांच्या शैक्षणिक धोरणाची सांगड घातली. त्यात त्यांनी गमतीने आजच्या शिक्षणाची भूमिकाही स्पष्ट केली. श्रीमती महाले यांनी विज्ञानवादी समाजात अंधश्रद्धा व अज्ञानावर प्रकाश टाकत अनेक दाखले दिले. आभार प्रा. प्रेमकुमार बोके यांनी मानले.
अध्यादेश काढू शाळा- महाविद्यालयांत गणपती बसवून आरती केली जाते. ही बाब विज्ञानवादी विद्यार्थ्यांसाठी योग्य नाही. हे बंद होण्यासाठी शासनाने अध्यादेश काढला. तो अध्यादेश अद्याप खालपर्यंत पोहोचला नाही. याची जाणीव अधिवेशनाद्वारे आयोजकांनी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांना करून दिली. हे उचित नाही, असे सांगून यासाठी पुन्हा अध्यादेश काढला जाईल, असे आश्‍वासन श्री. पुरके यांनी यावेळी दिले.









maratha seva sangh, sambhaji brigade, jijau brigade, shivdharma

Wednesday, June 4, 2008

मराठा सेवा संघाचे १३ वे

अधिवेशन अमरावतीला ...
पुण्यातील १२ व्या भव्य अधिवेशना नंतर आता अमरावती येथे १३ वे भव्य अधिवेशन .....हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा.


मराठा तितुका मेळवावा...

(पुरुषोत्तम खेडेकर) मराठा सेवा संघाचे १२ वे राष्ट्रीय अधिवेशन आज व उद्या पुण्यातील लक्ष्मीबाई शिंदे हायस्कूलच्या राजर्षी शाहू मैदानावर होत आहे. मराठा समाजाची सद्यःस्थिती व आव्हाने याचा आढावा घेणारा हा लेख. .......मराठा सेवा संघ हे नाव आज जगभरातील बहुतांशी जागृत मराठा व्यक्तीस; तसेच बहुजन समाजातील परिवर्तनशील चळवळीत काम करणाऱ्यांस परिचित आहे. संघामार्फत विविध समाजप्रबोधनाचे उपक्रम, सेवा संघाच्या विविध ३० कक्षांच्या माध्यमातून सुरू असलेले कार्यक्रम, समविचारी संघटनांचे पाठबळ यामुळे सेवा संघाचे कार्य विस्तार पावते आहे. मराठा समाज राजकीय क्षेत्रात मोठ्या संख्येने वावरत असला, तरी या समाजाची वैचारिक आणि सामाजिक ठेवण बदलण्याचे काम संघामार्फत सुरू आहे. समाजाच्या सांस्कृतिक परंपरा उजळविणे, त्यांचा नव्याने अर्थ लावणे यासाठी संघ प्रयत्नशील आहे. संघाच्या प्रयत्नातूनच राजमाता जिजामाता यांचा पहिला पुतळा सिंदखेडराजा येथे उभा राहिला. शिवजन्मस्थान असलेला शिवनेरीसह राजगड, पुरंदर या किल्ल्यांच्या जीर्णोद्धाराचे काम सरकारने हाती घेतले आहे. राज्य सरकार शिवसृष्टी उभारण्याचा मनोदय व्यक्त करीत आहे. शासकीय प्रकाशनांच्या माध्यमातून या परंपरा नव्याने मांडल्या जात आहेत. ही कामे होत असले, तरी अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे. समाजासमोर विविध आव्हाने आहेत. जागतिकीकरणाच्या रेट्यात मराठा समाजाला आपल्या अस्तित्वाची चुणूक दाखवावी लागेल. त्यासाठी कालबाह्य रुढींचा, समजुतींचा त्याग करावा लागेल. त्यासाठी मराठा सेवा संघ झटत आहे. राजसत्ता ही सर्व कुलपांची किल्ली आहे. मराठ्यांच्या हाती महाराष्ट्राची आणि देशाची सत्ता असल्याची चर्चा सर्वत्र होते. मात्र ही चर्चा दिशाभूल करणारी आहे. प्रशासन, न्याय व्यवस्था, प्रसारमाध्यमे, अर्थसत्ता, शिक्षणसत्ता या महत्त्वाच्या सत्तांपासून हा समाज लांब आहे. या क्षेत्रातही कर्तबगारी उंचावल्याशिवाय मराठा समाजाची सर्वांगीण प्रगती शक्‍य नाही. आयएस, आयपीएस या सेवांत मराठा तरुण कमीच आहेत. हे सर्व घडण्यासाठी समाजाने प्रगत तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. जगातील मुले आता संगणकाची भाषा बोलत आहेत. ही भाषा मराठा समाजानेही आत्मसात केली पाहिजे. प्रगतीतील समाजातील युवक नोकऱ्यांवर लाथ मारून स्वतःचे उद्योग उभे करीत आहेत. तर मराठा युवक अजूनही किरकोळ नोकऱ्यांसाठी रोजगार केंद्रासमोर रांगा लावत आहेत. मराठा तरुणी व्रतवैकल्ये, उपवास शोधून अंधश्रद्धांच्या साम्राज्यात वावरत आहेत. हे सर्व बदलावे लागेल. शेतीला पूरक व्यवसाय शोधा, असे अनेक जण सांगतात. माझा सल्ला वेगळा आहे. शेती हाच पूरक व्यवसाय म्हणून स्वीकारावा, असे माझे मत आहे. बहुतांश मराठा समाज हा शेतकरी आहे. उत्पादन खर्चावर आधारित मालाला भाव मिळेल, याची खात्री नसल्याने शेतकरी व पर्यायाने मराठा समाज आर्थिक अधोगतीकडे सरकतो आहे. विदर्भात गेल्या वर्षभरात १३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात १२४८ मराठा शेतकरी होते. हे आर्थिक शोषण थांबवायचे असेल तर शेतीला पर्याय शोधल्याशिवाय मार्ग नाही. जगाचा पोशिंदा म्हणायचे आणि त्यालाच आत्महत्या करण्यास भाग पाडायचे, अशी येथील रीत झाली आहे. त्यामुळे शेती सोडून इतर व्यवसाय करण्याची गरज निर्माण झाली आहे. मराठा समाजाचे धार्मिक शोषण थांबवून त्यासाठी खर्च होणारा पैसा हा मानसिक व बौद्धिक ताकद वाढविण्यासाठी खर्च करायला हवा. त्यासाठी शिवधर्माची स्थापना करण्यात आली. त्याला मोठा प्रतिसाद राज्यभरातून मिळाला. कर्मकांडे व अंधश्रद्धा यावर मराठा समाजाचा मोठा पैसा खर्च होत आहे. हा खर्च थांबविण्यासाठी शिवधर्माचे प्रयत्न सुरू आहेत. मराठा समाजाची प्रगती व्हावी यासाठी शास्त्रशुद्ध आखणी करून काम सुरू आहे. त्यासाठी विविध विभागांत काम करणाऱ्या ३१ कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, राजर्षी शाहू शिक्षण परिषद, डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद अशांचा त्यात समावेश आहे. नवीन आव्हानांचा स्वीकार करण्यासाठी परस्परांतील मतभेद कमी करावे लागतील. पंचकुळी, सप्तकुळी, शहाण्णव कुळी, कुणबी, पाटील, आगरी, देशमुख, घाटावरचे, घाटाखालचे अशा अनावश्‍यक पोटभेदांमुळे समाजाचे नुकसान झाले आहे. हे मतभेद मिटविण्यासाठी तरुण-तरुणींनी पुढे येण्याची गरज आहे. मराठा सेवा संघाची त्यांना साथ लाभेल. महाराष्ट्रात संख्येने सर्वाधिक असूनही या समाजाची अवस्था बिकट होता कामा नये. आपल्या शौर्याचा, पराक्रमाचा पोकळ अभिमान त्यासाठी सोडावा लागेल. मराठा सेवा संघाच्या पुण्यात आजपासून होणाऱ्या अधिवेशनात समाजाला पुढे जाण्याची दिशा यात निश्‍चितपणे मिळेल. त्यासाठी मोठ्या संख्येने सर्वांनी उपस्थित राहावे. - पुरुषोत्तम खेडेकर

शेतजमिनी काढून घेतल्यास मराठ्यांचा स्वाभिमान संपेल - माजी न्यायमूर्ती कोळसे
ता.२३ - "" विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) व कंत्राटी शेतीच्या नावाखाली शेतजमिनी काढून घेतल्यास मराठ्यांचा स्वाभिमान संपुष्टात येईल,'' असे मत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी आज येथे व्यक्त केले. ""छत्रपती शिवाजी महाराज व जिजामातेची बदनामी करणाऱ्यांचे हात कलम करावेत,'' असेही ते म्हणाले.

शेतजमिनी काढून घेतल्यास मराठ्यांचा स्वाभिमान संपेल - माजी न्यायमूर्ती कोळसे पाटीलपुणे, ता.२३ - "" विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) व कंत्राटी शेतीच्या नावाखाली शेतजमिनी काढून घेतल्यास मराठ्यांचा स्वाभिमान संपुष्टात येईल,'' असे मत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी आज येथे व्यक्त केले. ""छत्रपती शिवाजी महाराज व जिजामातेची बदनामी करणाऱ्यांचे हात कलम करावेत,'' असेही ते म्हणाले.
मराठा सेवा संघाच्या बाराव्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, जिल्हाध्यक्ष विजयकुमार ठुबे व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी ज्येष्ठ लेखिका सरोजिनी बाबर व बांधकाम व्यावसायिक सतीश मगर यांचा "मराठा विश्‍वभूषण पुरस्कार' देऊन गौरव करण्यात आला. सरोजिनी बाबर यांच्या वतीने त्यांच्या भगिनी कुमुदिनी पवार यांनी पुरस्कार स्वीकारला. श्री. कोळसे पाटील म्हणाले, ""छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पूर्वजांना दिलेल्या जमिनी बळकावण्याचा भांडवलदारांचा डाव आहे. संवेदना संपलेले राजकीय नेते त्यांना मदत करत आहेत. जमिनी गेल्यास हातात काहीच राहणार नाही. त्यामुळे छत्रपतींनी दिलेल्या जमिनींवर पाय ठेवण्याची भांडवलदारांची हिंमत होणार नाही, अशी कृती करण्याची गरज आहे.'' मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत ते म्हणाले, ""घटनेमध्ये शैक्षणिक व सामाजिक मागास असलेल्यांनाच आरक्षणाची तरतूद आहे. घटनेत बदल करण्यासाठी जनशक्तीचा प्रचंड रेटा आवश्‍यक आहे. त्यासाठी मागासवर्गीयांसह बहुजनांना एकत्र करून आपल्या मागणीचा पाठपुरावा केला पाहिजे.'' ""जातीच्या संघटना जरूर कराव्यात. पण ते करताना कोणाचा द्वेष करण्याची गरज नाही,'' असे ते म्हणाले. "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाशी संबंधितांचा सत्कार करताना लाज वाटली पाहिजे,' अशी टिप्पणी त्यांनी या वेळी केली. आरक्षणाबाबत आश्‍वासन दिल्याप्रमाणे सहा महिन्यांत निर्णय घेऊ, असे सांगून डावखरे म्हणाले, ""देशातील व राज्यातील मराठा नेतृत्वाने दुसऱ्यांना न्याय देताना स्वत: च्या समाजावर अन्याय करू नये. मराठ्यांची प्रबळ संघटनेची आवश्‍यकता आहे.'' श्री मगर म्हणाले, ""प्रगतीसाठी मराठा समाजाने एकत्र आले पाहिजे.'' अधिवेशनातील ठराव * मराठा समाजाचा "ओबीसी'त समावेश करण्याचे आश्‍वासन सहा महिन्यांत पूर्ण करावे. * शेतकऱ्यांची कर्जे माफ करून आत्महत्या थांबविण्याचा प्रयत्न करावा. * सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ अल्प, अत्यल्प भूधारकांना मिळावा. * भांडारकर संस्थेवर हल्ला प्रकरणी संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यांवरील खटले मागे घ्यावेत. * शिवराय व जिजाऊंच्या बदनामीप्रकरणी भांडारकर संस्थेवर प्रशासक नेमावा. एकत्र येत नाही, हीच खंत ""आरक्षण मिळविण्यासाठी मराठा समाज सक्षम आहे. पण सत्तेवर असलेल्या मराठा नेत्यांनी आमच्यावर अन्याय करू नये. आमच्या तलवारी तुमच्या मानेवर पडू नयेत, यासाठीच आम्ही त्या म्यान केल्या आहेत,'' असे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, ""मराठा समाजाचे नेते, मंत्री समाजाशी नाही तर पक्षाशी प्रामाणिक राहतात. त्यामुळे त्यांनी समाजासाठी जीव देण्याची भाषा करू नये. लाचार मंत्र्यांकडून आम्हाला अपेक्षाही नाहीत. यानंतरही मराठा समाजातील व्यक्ती गुणदोषांसह आम्ही स्वीकारल्या आहेत. मराठा सेवा संघाचा हेतू कोणाचा द्वेष करण्याचा नसून सत्यकथनाचा आहे. समाजाने शिक्षणाची कास धरावी, असा प्रयत्न आम्ही करत आहोत. मागासवर्गीय व मुस्लिमांना आम्ही एकत्र घेतल्यास सत्ता आमच्याकडेच येईल. पण एकत्र येत नाही, ही खंत आहे.''
""मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यास "मराठा विरुद्ध दलित' हा संघर्ष कमी होऊन नवनिर्मितीच्या दिशेने समाजाची वाटचाल सुरू होईल,'' असे मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे यांनी आज येथे सांगितले. आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी लढा करून यश संपादन करायचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. सहकारनगर येथील शिंदे हायस्कूलच्या प्रांगणात उभारलेल्या शाहूनगरीत मराठा सेवा संघाच्या बाराव्या अधिवेशनाच्या उद्�घाटन समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला वीर बाजी पासलकर यांचे वंशज ज्ञानोबा पासलकर, कान्होजी जेधे यांचे वंशज युवराज, हिरोजी भोसले यांचे वंशज सचिन व राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या शिक्षिका राजश्री भोसले यांचा सत्कार संत तुकाराम महाराजांची प्रतिमा व मानपत्र देऊन करण्यात आला. संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, तमिळनाडूतील तंजावर येथील सरदार घराण्यातील प्रभावती गाडे रावसाहेब काकू, लेखिका कुमुदिनी पवार, ग्रामीण पोलिस अधीक्षक विश्žवास नांगरे पाटील, कर्नाटकचे राजाराम गायकवाड, जपानच्या टोकियो शहरातील व्यावसायिक बाळासाहेब देशमुख, "संभाजी ब्रिगेड'चे अनंत चोंदे, जयश्री शेळके, सारिका भोसले, आमदार शरद ढमाले तसेच दीपक मानकर, रवींद्र माळवदकर, राजेंद्र कोंढरे, पांडुरंग बलकवडे, अभिनेते अशोक समर्थ उपस्थित होते. गोरे म्हणाले, ""मराठा सेवा संघाने हाती घेतलेल्या समाज जागृतीमुळे मराठा-मराठेतर संघर्षाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी होत आहेत. अंधश्रद्धा, रूढी-परंपरेतून समाज मुक्त होत आहे. मात्र, आम्ही अजूनही अस्वस्थ आहोत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. छोटे-मोठे उद्योग सुरू करण्यास तरुणांना प्रोत्साहन देत असलो तरी बेरोजगारीचा प्रश्žन मोठा आहे. मराठा समाजासाठी सहा महिन्यांत आरक्षण देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. त्यानुसार आरक्षण लागू करावे, यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून मुख्यमंत्र्यांना निवेदने देण्याची मोहीम राबविण्यात येईल.'' मराठा सेवा संघाच्या कार्याचा आढावा घेताना ते म्हणाले, ""मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले तरी त्यांचा इतिहास धार्मिक बंधनात अडकला. त्यामुळे मराठ्यांचे कर्तृत्व पुढे आले नाही. इतिहास लेखनातील हा अन्याय व कलंक पुसून सत्य इतिहास मांडण्याचे काम सेवा संघ करत आहे. धार्मिक गुलामगिरी, वैदिक धर्माच्या बेड्यांतून बहुजन समजाला मुक्त करून शिवधर्माचा स्वीकार करून त्यांना चैतन्यदायी मार्गावर नेत आहोत. येत्या ता. १२ जानेवारीला हजारो जण शिवधर्माची दीक्षा घेणार आहेत. भटजींना न बोलविता होणारे विवाह; तसेच सण, उत्सवावरचा खर्च वाचवून शिक्षण व उद्योगधंद्यासाठी हा पैसा वापरण्यास झालेली सुरवात हे संघाच्या कामाचे यश आहे. जगभरातील मराठा समाजातील व्यक्तींपर्यंत हे कार्य पोचविण्याचे काम सुरू आहे. विकृत इतिहासाला जबाब देण्याचे काम "संभाजी ब्रिगेड' करत आहे.'' राजाराम गायकवाड म्हणाले, ""शहाण्णव, ब्याण्णव कुळी असा भेदभाव करणे समाजासाठी घातक आहे. मराठा सेवा संघामुळे शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समोर येत असून, त्यानुसार कर्नाटकातील मराठी समाजाने बदल करण्यास सुरवात केली आहे.'' प्रास्ताविक भाषणात विजयकुमार ठुबे म्हणाले, ""मराठा समाजाने एकत्र येऊन स्वत:चा विकास करणे काळाची गरज आहे. मराठा सेवा संघ परिवर्तनवादी चळवळ झालेली आहे.'' लाल महाल येथील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवून तेथे शहाजी महाराजांचा पुतळा उभारावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. श्रीमंत कोकाटे व जयश्री शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. दोन दिवसांच्या अधिवेशनाला राज्यभरातून महिला व कार्यकर्ते आले आहेत.
"शिवसृष्टी' येत्या वर्षभरात "
"पुण्यात येत्या वर्षभरात शिवसृष्टी उभारण्यात येईल,'' असे पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष बापू पठारे यांनी सांगितले. दीपक मानकर यांनी ही मागणी केली होती. "पालिकेतर्फे यासाठी जागा देण्यात येईल; तसेच पालिकेच्या अर्थसंकल्पात यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येईल,' असेही पठारे यांनी सांगितले.
maratha seva sangh, sambhaji brigade, jijau brigade, shivdharma